‘Breaking the Habit of Being Yourself’
(Author Joe Dispenza)
For paper and Digital version on Amazon, Click Here
तरंग भवतालचे (2021, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)
“तरंग भवतालचे’ पुस्तकामधील सर्वच भवताल अमेरिकेतील नाही. पुस्तकातील पहिल्या विभागात (आसपासच्या गोष्टी) काही लेखांमध्ये जागतिक अनुभव आहेत. काही लेखांमध्ये परिचित गोष्टींबद्दल अपरिचित माहिती दिली आहे. पुस्तकातील दुसऱ्या विभागात (छोट्या गावांच्या मोठ्या गोष्टी) स्थळ-वर्णनांमधून जाणवते ती लेखिकेची जिज्ञासा. नवे नवे अनुभव घेण्याची असोशी आणि गावांचं वेगळेपण टिपण्याची ताकद. ’गोष्टी थोरामोठ्यांच्या’ या विभागात काही परिचित व्यक्तींच्या मुलाखती आहेत. परंतु त्यांचा इथे वेगळा नव्या दृष्टीने परिचय करून दिला आहे. ओघवत्या भाषेमुळे ’तरंग भवतालचे’ हे पुस्तक अतिशय वाचनीय झाले आहे.
वेगवेगळ्या अनुभवक्षेत्रांमध्ये वावरताना स्वत:चा ‘मी’ आपल्या लेखनात फार आक्रमक होऊ न देणं ही कसरत लेखिकेने यशस्वीपणे पार पाडली आहे. हे भवतालचे तरंग वाचकांना गुंतवून ठेवतील, याबद्दल खात्री वाटते.”
– उषा तांबे (प्रस्तावनेतून…)
For paper and e copy – Click Here
‘The Book Thief’ (Author- Markus Zusak)
” ‘पुस्तकचोर’ ही कादंबरी जीवनाच्या जवळजवळ प्रत्येकच अंगाला स्पर्शून जाते म्हटले, तरी अतिशयोक्ती होणार नाही. जन्ममृत्यूच्या टोकांमधील – प्रेम आणि द्वेष, भीती आणि आनंद, दु:ख आणि नियतीने दिलेल्या भोगाचा निमूट स्वीकार, या सगळ्या छटा त्यातून आपल्या भेटीला येतात. जर्मन राष्ट्रातील वेगवेगळ्या स्तरातील ज्यू आणि क्रिश्चन नागरिकांच्या सर्व तऱ्हा त्यात आढळतात. हे सर्व वातावरण, मराठी वाचकाला पुष्कळसे अपरिचित असे वास्तव अनुवादातून जिवंत करण्यांत अनुवादिका यशस्वी झाली आहे. हा अनुवाद वाचल्यावर आपले भावविश्व समृध्द झाल्याचा एक अनोखा आनंद वाचकाला मिळणार हे निश्चित! ”
For Paper copy Click Here
ठसे आठवांचे (2017, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)
“आपण आणि आपला भवताल, आपण आणि आपले नातेबंध, आपण आणि आपली भूमी याविषयी किती आणि कसा विचार करू शकतो, याचे तरलपण दाखविणारा हा ललितलेखांचा संग्रह आहे. बाह्य सौंदर्य आणि आंतरिक सौंदर्य टिपण्यासाठी सजग-तरल दृष्टी लाभलेल्याला सारेच सुंदर दिसते. तशी दृष्टीच व्यापक असेल, चौफेर असेल तर तिचा आवाकाही व्यापक असतो, याचा प्रत्यय या लेखांतून येतो.”
For Kindle copy Click Here
क्षितिज पश्चिमेचे (2013, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई)
“भारत-अमेरिका सेतू बांधण्याचे प्रयत्न अनेकांनी केले आहेत. त्यातल्या काहींची शब्दचित्रे विनता कुलकर्णी यांनी या पुस्तकात संवेदनशीलतेने काढली आहेत. अनेक सत्यचित्र चरित्रकथांनी हे पुस्तक भारलेले आहे. १४-९४ वयोगटातील विविध प्रकारच्या व्यक्ती, प्रकृती आणि जीवनशैली या पुस्तकात आढळतात. प्रत्येक मराठी अमेरिकनाने, आणि प्रत्येक महाराष्ट्रीय मराठी माणसाने संग्रही ठेवण्यासारखे हे पुस्तक आहे. ”
For e-copy- on Kindle: Click Here
Website Created and Copyright: Vinata Kulkarni